जुना रेपनपल्ली येथे शीतल मातेची प्राणप्रतिष्ठापणा व बोनालू कार्यक्रम मोठ्या उत्सहात
काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण संपन्न

अहेरी : जुना रेपनपल्ली येथे काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शितल माता मंदिराचे मोठ्या उत्साहात उदघाटन करण्यात आला.
अहेरी तालुक्यातील जुना रेपनपल्ली येथे माता मंदिर नसल्यामुळे गावांतील प्रत्येक प्रवर्गातील समाज बांधवाना उत्साहात कार्यक्रम घेण्यासाठी अडचन भासत होती.प्रत्येक वैयक्तिक कार्यक्रम असेल,सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल सर्व प्रथम माता मंदिरत जावून पूजा अर्चना करून बाकीचे कार्यक्रम पार पाळतात.
येथील माता मंदिर बांधकाम निर्माणीसाठी गाव वर्गणीतून काही प्रमाणात माता मंदिर बांधकाम करण्यात आली होती.मात्र पुढील माता मंदिर बांधकामसाठी येथील ग्रामस्था खूपच आर्थिक अडचण भासत असल्याची माहिती काल उदघाटन प्रसंगी अजय कंकडालवार यांच्या कानावर पडुन दिले होते.
त्यावेळी कंकडालवारांनी येथील ग्रामस्थाची अडचण लक्षत घेऊन माता मंदिराचे उर्वरित बांधकामासाठी मी माझ्या स्व:खर्चाने येत्या काही दिवसात पूर्ण करून देण्याची येथील नागरिकांना आश्वासन दिले.येथील नागरिकांनी कंकडालवार यांचे आभार मानले.
जुना रेपनपल्ली येथे नवनिर्मित शीतल मातेची प्राणप्रतिष्ठा कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या ठिकाणी मातेची बोनालू कार्यक्रमाही मोठ्या उत्सहात व थाटात संपन्न झालं.
यावेळी अजय कंकडालवार यांनी माता मंदिरचे उदघाटन करून शीतल मातेची विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले.दरम्यान अजयभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो ही शीतल माताची दर्शन घेतांना चरणी प्रार्थना केली.सह उदघाटक म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी होते.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा आलम गावातील समस्त नागरिक व भाविक तसेच आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.