Uncategorized

येल्ला येथील बोनालू कार्यक्रमाला काँग्रेसचे नेत्या व माजी उपसभापती सोनालीताई कंकडालवार यांची उपस्थित

मूलचेरा : तालुक्यातील येल्ला येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मदनाम पोचम्मा देवीची बोनालु यात्रा शेकडो भक्तजनांचा उपस्थितीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.या बोनालू यात्रेला आविसं व काँग्रेसचे नेत्या,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसंमवेत उपस्थिती दर्शवून पोचम्मा देवींची पूजा अर्चना करून आशीर्वाद घेतले.

यावेळी ताईंनी देवीच्या चरणी  गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.तसेच येथील स्थानिक प्रमुख समस्या जाणून घेतले.

यावेळी लिंगाजी टेकूलवार,साईनाथ पानेवार,शंकर पानेवार,अशोक आत्राम,सुरेश रामटेके,नामदेव आत्राम,संतोष हजारे,निलेश पानेवार,लचमा टेकूलवार,सोमा टेकूलवार स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close