Uncategorized
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पीक व घरांचे नुकसानीची पंचनामे करून तात्काळ भरपाई द्या

अहेरी : मंगळवार ला झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटामुळे शेतकऱ्यांची व नागरिकांची अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे पिकांचे आणि वादळी वाऱ्यामुळे पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी आविसं,काँग्रेस काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जि.प माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
अवकाळी पाऊस,वादळी वारा आणि गारपीटामुळे अहेरी तालुक्याला खूप मोठा फटका बसले असून यामुळे शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांची अतोनात नुकसान झाले.काँग्रेसनेते कंकडालवार यांनी अहेरीचे तहसीलदार यांना सांगून नुकसानग्रसतांचे पंचांनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे.