Uncategorized

मेडपल्ली येते धान खरेदी सुरू होणार, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

अहेरी : तालुक्यातील पेरमिली अंतर्गत येत असलेल्या मेडपल्ली येथील आदिवासी विविध सहकारी संस्था पेरमिली येते धान खरेदी केंद्र असून पेरमिली”या”क्षेत्रा मध्ये एकूण 40 ते 45 गावे येतात.त्यामुळे येथील शेतकरी धान पीक करत असतात.

मेडपल्ली गावसह इतर गावकर्यांनी खरेदी केंद्रावार 10 ते 15 दिवस मुक्काम करावा लागत होते.”या”10 ते 15 दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांना खूप अडचणीच निर्माण कराव लागत होते.धान खरेदी पेरमिली येते धान विक्री करण्यासाठी”या”40 ते 45 गावांचे अंतर सुद्धा लांब असल्यामुळे शेतकऱ्यांना धान खरेदीसाठी धान अनण्यासाठी खूप अडचण निर्माण होत होते.

आणि गौरसोय टाळण्यासाठी पेरमिली अंतर्गत मौजा मेडपल्ली येते धान खरेदी उपकेंद्र सुरु झाल्यास.मेडपल्ली अंतर्गत 10 ते 15 गावांना धान खरेदी विक्री करण्यासाठी सोईचे होईल.धान खरेदी केंद्राचा अंतर जवळ होईल अशी मेडपल्ली येथे धान खरेदी करण्यासाठी सोईसुविधा उपलब्ध आहे.त्याकरिता मेडपल्ली येथे धान खरेदी उपकेंद्र व नवीन धान खरेदीदार सहाय्यक यांची निवड करण्यात यावी म्हणून.

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली होती.

“या”शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून मेडपल्ली येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मंजुरी मिळवून दिली.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यावेळी समस्त गावातील शेतकऱ्यांनी अजयभाऊंची आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close