Uncategorized

असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणालभाऊ पेंदोरकर यांचा वाढदिवस उत्साहात

संतोषभाऊ ताटीकोंडावार यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा

गडचिरोली | असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री.कुणालभाऊ पेंदोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते व जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री.संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी कुणालभाऊ पेंदोरकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

यावेळी संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी कुणालभाऊंना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.कुणालभाऊंनी असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.त्यांना निरोगी,उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो,अशा शुभेच्छा ताटीकोंडावार यांनी दिल्या.

याप्रसंगी दोन्ही नेत्यांमध्ये जिल्ह्यातील असंघटित कामगारांच्या समस्या,सामाजिक प्रश्न आणि आगामी संघटनात्मक कामकाज यावर सविस्तर चर्चा झाली.

कुणालभाऊ पेंदोरकर यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल संतोषभाऊ ताटीकोंडावार यांचे आभार मानले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close