Uncategorized

इंदाराम येथील महिलेची प्रकृती बिघडल्याने अहेरीत उपचारासाठी दाखल

डॉ.अजय कंकडालवार यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट, मदतीचा दिला विश्वास

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील रहिवासी महिला सुगंदा सुरेश मडावी यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.ही बाब लक्षात येताच गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय नैताम यांनी या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रभारी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना दिली.

माहिती मिळताच डॉ.कंकडालवार यांनी कोणताही विलंब न करता थेट अहेरी उप जिल्हा रुग्णालय गाठले.त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या सुगंदा मडावी यांच्या खाटेजवळ जाऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि त्यांच्या तब्येतीची सविस्तर माहिती घेतली.

यानंतर डॉ.कंकडालवार यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेऊन रुग्णाच्या प्रकृतीबाबत चर्चा केली.यावेळी डॉक्टरांनी सांगितले की,सदर महिलेला रक्ताची कमतरता (अॅनिमिया) असल्याने तिची तब्येत बिघडली असून तिला तात्काळ रक्ताची आवश्यकता आहे.

डॉक्टरांचे म्हणणे ऐकून डॉ. कंकडालवार यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत,रुग्णाच्या रक्तासाठी कुठलीही काळजी करू नका.रक्तपेढीत रक्त उपलब्ध झाले नाही तर माझे कार्यकर्ते रक्तदान करण्यासाठी सज्ज आहेत.कोणत्याही परिस्थितीत रुग्णाचे उपचार थांबू देऊ नका,अशा स्पष्ट सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानंतर त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.लवकरच बरी होईल,उपचाराला काहीही कमी पडू देणार नाही.काहीही अडचण आली तर थेट मला संपर्क साधा,असे आश्वस्त करत त्यांनी रुग्णाची योग्य काळजी घेण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या.

डॉ.कंकडालवार यांच्या या तातडीच्या मदतीमुळे आणि संवेदनशीलतेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनेत्याची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली 

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीत कायम धावून जाणारे नेतृत्व म्हणून डॉ.अजय कंकडालवार यांची ओळख आहे.रुग्णसेवा असो वा शेतकऱ्यांचे प्रश्न,त्यांनी नेहमीच तत्पर मदत केल्याचे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close