मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी लढा देण्याची गरज ; डॉ.अजय कंकडालवार
गडचिरोलीत'वोट बचाओ,देश बचाओ'अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली : भारतीय लोकशाहीसमोर निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने हाती घेतलेल्या ‘वोट बचाओ,देश बचाओ’ या देशव्यापी अभियानांतर्गत आज गडचिरोली येथे भव्य संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
लोकशाही मूल्यांचे जतन, संविधानाचे संरक्षण आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आधारित या बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मध्यप्रदेश राज्याचे माजी गृहमंत्री तथा मध्यप्रदेशातील राजपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मा.श्री.बाला बच्चन उपस्थित होते.त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार नामदेवरावजी कीरसान आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी संवाद बैठकीत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले.
मताचे रक्षण हेच देशाचे रक्षण’ – डॉ. अजय कंकडालवार
आपल्या भाषणात डॉ.अजय कंकडालवार म्हणाले की,आज देशात मतदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.मतदार यादीतील घोळ, मतदान यंत्राबाबत संभ्रम आणि मतदारांना दाबण्याचे प्रयत्न हे लोकशाहीसाठी घातक आहेत.वोट बचाओ,देश बचाओ’ हे केवळ घोषवाक्य नसून ती लोकशाही वाचवण्याची चळवळ आहे.प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या बूथवर,आपल्या गावात प्रत्येक मतदार जागृत राहील,त्याचे मत सुरक्षित राहील यासाठी काम केले पाहिजे.मताचे रक्षण हेच देशाचे रक्षण आहे.
लोकशाही मूल्ये टिकली तरच संविधान टिकेल आणि संविधान टिकले तरच या देशातील गरीब,आदिवासी,दलित आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल,असे प्रतिपादन त्यांनी केले.
या संवाद बैठकीला जिल्हाभरातून काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये प्रभारी जिल्हाध्यक्ष पंकज गुड्डेवार,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ मेश्राम,प्रदेश सरचिटणीस रवींद्र दरेकर,दुष्यंत कीरसान, कुसुमताई आलाम,माधुरी मडावी, विविध तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,मनोज अग्रवाल,मिलिंद खोब्रागडे,प्रशांत कोराम यांच्यासह शेकडो प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी हे अभियान प्रत्येक बूथ स्तरावर,प्रत्येक गावागावात पोहोचवण्याचा आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार जागृती मोठ्या प्रमाणात करण्याचा एकमुखी निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.



