Uncategorized

वोट बचाओ- देश बचाओ रॅलीसाठी काँग्रेसचे डॉ.अजय कंकडालवार दिल्लीत दाखल

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली उद्या दि.१ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर होणाऱ्या’वोट बचाओ देश बचाओ’ या राष्ट्रीय महाआंदोलनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव,गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रभारी डॉ.अजयभाऊ कंकडालवार हे गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.दिल्लीत दाखल होताच डॉ. कंकडालवार आणि त्यांच्या शिष्टमंडळाने तात्काळ संघटनात्मक कार्याला सुरुवात केली आहे.

दिल्ली दौऱ्यादरम्यान डॉ.अजय कंकडालवार व गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ.मा.सिरिवेल्ला प्रसादजी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती, आगामी रणनीती आणि आदिवासी भागातील प्रश्नांवर त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

तसेच नागपूर पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा.अभिजित वंजारी साहेब यांची देखील भेट घेऊन त्यांना नुकत्याच झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजय मिळवल्याबद्दल डॉ.कंकडालवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

‘वोट बचाओ देश बचाओ’ हे आंदोलन केवळ एक राजकीय कार्यक्रम नसून,देशातील लोकशाही मूल्ये,संविधान आणि प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी पुकारलेला एल्गार आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या समस्या,त्यांच्या हक्कांचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी डॉ. कंकडालवार आक्रमक भूमिकेत आहेत.

यावेळी डॉ.अजय कंकडालवार म्हणाले,संविधान वाचवण्यासाठी आणि देशातील प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी मा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात आमचा हा संघर्ष सुरूच राहील.प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ.सिरिवेल्ला प्रसादजी आणि आमदार अभिजित वंजारी यांच्याशी झालेल्या चर्चेतून गडचिरोलीच्या विकासासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.गडचिरोलीची जनता आणि काँग्रेस पक्ष राहुल गांधीजींच्या नेतृत्वात हा लढा शेवटपर्यंत लढेल.

उद्या दिल्ली येथे होणाऱ्या रामलीला मैदानावरील ऐतिहासिक रॅलीसाठी डॉ.कंकडालवार आणि गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी सज्ज झाले असून,विशेष म्हणजे या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close