गडचिरोलीत गानली समाजाचा भव्य कोजागिरी उत्सव व नामावली विमोचन सोहळा
विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन,डॉ.अजय कंकडालवार यांचे विशेष मार्गदर्शन

गडचिरोली | गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ तथा अखिल भारतीय गानली समाज संघटना जिल्हा शाखा – गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी,ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा व गानली समाज नामावली विमोचन व वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम दिनांक २७ ऑक्टोबर २०२६, मंगळवार रोजी सायंकाळी ७.०० वाजता गानली समाज सभागृह,शिवानी पेट्रोल पंप समोर,आरमोरी रोड,गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र व अध्यक्ष,अखिल भारतीय गानली समाज संघटना मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे उपस्थित होते.
डॉ. अजय कंकडालवार विशेष अतिथी म्हणून उपस्थित
या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.कंकडालवार म्हणाले की,गानली समाज हा अत्यंत संघटित आणि शिक्षणाला महत्त्व देणारा समाज आहे.ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे.समाजाच्या नामावलीचे विमोचन आणि ज्येष्ठांचा सत्कार हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.समाजातील युवकांनी शिक्षण घेऊन समाजाला पुढे नेले पाहिजे,यासाठी माझे नेहमीच सहकार्य राहील.
कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गानली समाज नामावलीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला गानली समाजातील बांधव सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



