Uncategorized

मंगुठा येथील व्हॉलीबॉल स्पर्धेचे सोनालीताई कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

एटापल्ली : ग्रामीण भागातील लपलेल्या क्रीडा प्रतिभेला वाव मिळावा आणि युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता क्रीडा क्षेत्रात आपले भविष्य घडवावे,या उदात्त हेतूने एटापल्ली तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंगुठा येथे जय गोंडगोवारी जय जोहार क्रिडा मंडळ,मंगुठा यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन काँग्रेस पक्षांचे नेत्या सोनालीताई कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रथम पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रभारी,युवकांचे प्रेरणास्थान डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून देण्यात येत आहे.

द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हनुमंतू मडावी यांच्याकडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक एटापल्ली तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रमेश गंपावार व ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्या,सौ.जमुना गावडे यांच्याकडून संयुक्तपणे देण्यात आले आहे.

सदर भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.या कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हनुमंतू मडावी हे उपस्थित होते.त्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी मंचावर आणि मैदानावर प्रज्वल नागूलवार आलापल्ली तालुका कॉग्रेस सचिव,सरोज कीशोर दुर्गे माजी सरपंच नागेपल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक न.प.अहेरी,रमेश वैरागडे माजी कृषिउत्पन्न बाजार समिती संचालक अहेरी, महेश बिरमावार,जमुनाताई गावडे जेस्ट कॉग्रेस कार्यकर्ते, लखूजी गावडे गाव पाटील मंगूटा,उमेश मडावी ग्रा,प.सदस्य येमली,चिना वेलादी, अजय गावडे,प्रमेश वेलादी,राकेश वेलादी,विष्णू नरोटे,संदीप तलाडी,दौलत आलाम, सत्यवान वेलादी,मल्लेश पुगाटी,सि.पि.वेलादी,किशोर दुर्वा यांच्या सह येमली,मंगुठा परिसरातील स्थानिक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी, गावातील महिला,युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.टाळ्यांच्या गजरात आणि घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की,ग्रामीण भागात अशा प्रकारच्या भव्य क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याने येथील युवक नशापाणी आणि वाईट व्यसनांपासून दूर राहून क्रीडा क्षेत्राकडे वळतील.यातूनच उद्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील आणि गडचिरोली जिल्ह्याचे तसेच मंगुठा गावाचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करतील.

जय गोंडगोवारी जय जोहार क्रिडा मंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून,डॉ.अजय कंकडालवार यांनी नेहमीच ग्रामीण क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close