अहेरी येथे गानली समाज बहुउद्देशीय मंडळाचा भव्य कोजागिरी पौर्णिमा उत्सव
डॉ.अजय कंकडालवार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन, समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहेरी | सामाजिक एकता आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने गानली समाज बहुउद्देशीय मंडळ,अहेरीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमा महोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता निर्माणाधीन गानली समाज सभागृह अहेरी येथे पार पडला.
या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिव्हिल कंत्राटदार मा.श्री.व्यंकटेशजी बोमावार होते,तर मंडळाचे अध्यक्ष मा. श्री.नरेश बोमावार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्री.अजय कंकडालवार हे लाभले होते.त्यांच्यासमवेत गानली समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,ज्यात मा.श्री.अशोकराव एम.सोमनावर, मल्लेरेड्डीजी बी.बोमावार, श्रीनिवासजी गड्डूया गहदेवार,पापुरेड्डीजी आर.गोडसेलवार,मल्लेरेड्डीजी एम.येनगटवार,अतुलराव आर. नागुलवार,मोहनराव आर.आईनवार,लव्याजी एम.गहदेवार,सत्यनारायणजी एम. गहदेवार,अजयाराव बी. नागुलवार, मनोजराव एल.शेपूर्तिवार, लक्ष्मणरेड्डीजी बी.चिलंमवार,राजू बी.बोमावारजी यांचा समावेश होता.
डॉ. अजय कंकडालवार यांचे मार्गदर्शन – समाजाने शिक्षणावर भर द्यावा
कार्यक्रमात उपस्थित समाज बांधवांना संबोधित करताना डॉ.अजय कंकडालवार यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की,गानली समाज हा अत्यंत मेहनती आणि संस्कृती जपणारा समाज आहे.आजच्या काळात समाजाने केवळ सण-उत्सवापुरते एकत्र न येता,शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात एकमेकांना मदत केली पाहिजे.आपल्या पुढच्या पिढीला उच्च शिक्षण देऊन मोठ्या पदावर पोहोचवणे हेच आपले खरे ध्येय असले पाहिजे.समाजाच्या या निर्माणाधीन सभागृहासाठी माझे नेहमीच सहकार्य राहील,असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी गानली समाज बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने डॉ.अजय कंकडालवार यांचे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पुष्पहार घालून जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत मंडळाने त्यांचा विशेष सन्मान केला.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे आगमन,स्वागत,दीपप्रज्वलन आणि प्रास्ताविक भाषणाने झाली. त्यानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.मान्यवरांचे मार्गदर्शन,अध्यक्षीय भाषण,आभार प्रदर्शन,प्रश्न मंजुषा आणि बौद्धिक कार्यक्रमांनी सायंकाळ रंगतदार झाली.
कार्यक्रमाची सांगता रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाने झाली. या सोहळ्याला गानली समाजातील महिला,युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



