गटबांधणी व इतर मजुरांची पाच महिन्यांपासून मजुरी थकली; मजुरांवर उपासमारीची वेळ
मजुरांनी दिली काँग्रेस नेते डॉ.कंकडालवार यांना मजुरी मिळवून देण्यासाठी निवेदन...मजुरांनी दिली १३ ऑक्टोबरपासून उपोषण,आंदोलनाचा इशारा

अहेरी : आल्लापल्ली येथील वनपरीक्षेत्र अधिकारी मध्यवर्ती काष्ठ भांडार येथे म.का.भो.क्र.१मध्ये ओढणावळ, मोजमाप,गटबांधणी केलेल्या मजुरांची मागील पाच महिन्यांपासून मजुरी थकल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून थकीत मजुरी मिळवून देण्याची त्यांनी काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिलेल्या निवेदन केली आहे.
जंगलातून प्राप्त झालेल्या इमारती मालाची मोजमाप करून,त्याचे ओढणावळ करून गटबांधणीचे काम करीत असतात.परंतु मे २०२६ पासून मजुरांना कामाची मजुरी आजपर्यंत मिळालेली नाही.त्यामुळे सर्व मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याची निवेदनात नमूद केली आहे.
पाच महिन्याची मजुरी थकल्याने दुकानदारांनी उधारी देणे बंद केलेले आहे.खायला काहीच नाही.अशा परिस्थितीत सावकाराकडून १०% व्याजाने कर्ज घेतलेले आहे.तेही कर्ज परतफेड करणे शक्य होत नसल्याने संबंधित कार्यालयाला मजुरी मिळण्यासाठी पत्र व्यवहार केला असला,तरीही मजुरांची मजुरी मिळालेली नाही,अशी व्यथा मजुरांनी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनातून मांडली आहे.
या सर्व कारणांमुळे घेतलेल्या १०% कर्जामुळे मुलांचे शिक्षण, आजारावर औषधोपचार, हप्त्यातील बाजार,इतर घरगुती दैनंदिन खर्च भागविणे मजुरांवर मानसिक त्रास होत आहे. असे अनेक सर्व कारणांमुळे मजूरवर्ग आर्थिक अडचणीत सापडल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.
गटबांधणी व इतर मजुरांनी डॉ.कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनात थकीत मजुरी मिळवून देण्याची मागणी करत जर थकीत मजुरी न मिळाल्यास संबंधित विभागाचे कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन करणार असल्याचे तसेच आंदोलनाला आवश्यक सहकार्यासह पाठिंबा देण्याचे विनंती केली आहे.



