Uncategorized

स्वातंत्र्याला ८० वर्षे झाली तरी चिखलातूनच प्रवास; आसा-मोदुमडगू ते माड्रा पक्का रस्त्यासाठी अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात निवेदन

अहेरी (गडचिरोली): अहेरी तालुक्यातील आसा-मोदुमडगू ते माड्रा या गावांना जोडणाऱ्या मार्गावर आजतागायत पक्का रस्ता उपलब्ध नाही.स्वातंत्र्याची ८० वर्षे पूर्ण होऊनही या भागातील नागरिकांना चिखलातून पायवाटेने ये-जा करावी लागत आहे.या गंभीर समस्येवर तातडीने लक्ष देऊन पक्का रस्ता मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली व समस्त ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत अपर जिल्हाधिकारी अहेरी यांना निवेदन देऊन करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की,विशेषतः पावसाळ्यात हा मार्ग अत्यंत खराब व धोकादायक बनतो.त्यामुळे विद्यार्थी,शेतकरी, रुग्ण,महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

या मार्गाअभावी शाळा,आरोग्यसेवा,बाजारपेठ आणि इतर अत्यावश्यक सुविधांपर्यंत पोहोचणे कठीण होत आहे.आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेणेही अवघड होते,अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागाकडून मार्गाची पाहणी व आवश्यक सर्वेक्षण करून घ्यावे,तसेच आसा-मोदुमडगू ते माड्रा मार्गासाठी पक्का रस्ता मंजूर करून काम सुरू करण्यासाठी शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करावा,ही नम्र विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

या मागणीचा गांभीर्याने विचार करून नागरिकांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर करण्यासाठी आपण सहकार्य कराल,अशी अपेक्षा आहे,असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी अजय कंकडालवार,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम यांच्यासह समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close