Uncategorized

अखेर अजयभाऊ कंकडालवार यांच्या मागणीला यश; कोठारी गावात नवीन ट्रान्सफार्मर बसवून वीजपुरवठा सुरू

मुलचेरा : कोठारी गावात मागील काही दिवसांपासून खंडित झालेला वीजपुरवठा अखेर सुरू झाला आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले असून,महावितरणने कोठारी गावात नवीन ट्रान्सफार्मर बसविला आहे.

यापूर्वी कोठारी गावातील ट्रान्सफार्मर वारंवार खराब होत असल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले होते.घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास,आरोग्य सेवा,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली होती.रात्रीच्या वेळी अंधारामुळे वृद्ध,महिला व लहान मुलांना असुरक्षिततेचा सामना करावा लागत होता.

या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढावा यासाठी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली कोठारी ग्रामस्थांनी सहाय्यक अभियंता,महावितरण वितरण कंपनी मर्यादित,उपविभाग आलापल्ली यांना निवेदन देऊन नवीन ट्रान्सफार्मर बसवण्याची मागणी केली होती.तसेच तातडीने कारवाई न झाल्यास शांततापूर्ण आंदोलनाचा इशाराही दिला होता.

या निवेदनाची दखल घेत महावितरण प्रशासनाने गावात नवीन ट्रान्सफार्मर बसवून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचे आभार मानले आहेत.

गावाच्या समस्येवर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला.गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे महावितरणला कारवाई करावी लागली,अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

नवीन ट्रान्सफार्मरमुळे आता कोठारी गावाचा वीजपुरवठा सुरळीत होणार असून,शेतकऱ्यांचे पंप,विद्यार्थ्यांचा अभ्यास व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close