Uncategorized

अन्नदान कार्यक्रमासाठी डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांचा मदतीचा हात

प्राणहिता शारदा मंडळाच्या अन्नदान उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य

सिरोंचा | सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत व्येंकटापूर अंतर्गत येणाऱ्या ग्लासफोर्डपेठा येथील प्राणहिता शारदा मंडळाच्या अन्नदान कार्यक्रमासाठी आर्थिक मदत दिली.

डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांचे कट्टर समर्थक श्री.वेंकटस्वामी रामटेके यांच्या माध्यमातून ही आर्थिक मदत मंडळाकडे सुपूर्द करण्यात आली.यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.कंकडालवार यांच्या या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

अन्नदान हा केवळ एक उपक्रम नसून माणुसकी,सामाजिक एकोपा आणि सेवाभाव जपणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.अशा सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सहकार्य करून डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

ग्रामीण भागातील सामाजिक व धार्मिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे आणि समाजातील एकोपा अधिक दृढ व्हावा,या दृष्टीने अशा प्रकारचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरते.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या वतीने वेंकटस्वामी रामटेके यांनी आर्थिक मदत सुपूर्द केल्याने प्राणहिता शारदा मंडळाच्या अन्नदान कार्यक्रमाला मोठे सहकार्य लाभले असून कार्यक्रम यशस्वी पार पडला.

यावेळी मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी तिरुपती येदासुला,रमेश जूनगरी, राजेंद्र कावरे, शेखर अल्लुरी, राम येदासुला, राजेश दुर्गम, सुभाष अल्लुरी, गौतम कुम्मरी, राजेंदर चंद्रगिरी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक कार्याला प्राधान्य देत समाजातील विविध उपक्रमांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी दिलेली ही मदत सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण ठरत आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close