Uncategorized

शारदीय नवरात्री उत्सवात अहेरी विधानसभा क्षेत्रात भक्तीमय वातावरण

कंकडालवार दाम्पत्याकडून विविध शारदा,दुर्गा व बतुक्कम्मा मंडळांना भेट

अहेरी | शारदीय नवरात्री उत्सवाच्या पावन पर्वावर अहेरी विधानसभा क्षेत्रात भक्ती,श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार दाम्पत्यांनी विधानसभा क्षेत्रातील विविध शारदा,दुर्गा तसेच बतुक्कम्मा मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले.

यावेळी कंकडालवार दाम्पत्यांनी एकता शारदा मंडळ आलापल्ली, श्री.युवा शारदा मंडळ टेकडी कॉलनी आलापल्ली,सार्वजनिक शारदा मंडळ फोरेस्ट कॉलनी आलापल्ली,गुप्पा शारदा मंडळ अहेरी येथे आयोजित महाआरती कार्यक्रमाला उपस्थिती राहून शारदा व दुर्गा मातेची विधिवत पूजा-अर्चना करून दर्शन घेतले.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि भाविकांनी कंकडालवार दाम्पत्याचे पुष्पहार,शाल व श्रीफळ देऊन उत्स्फूर्त स्वागत केले.आरतीनंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधताना अजयभाऊ कंकडालवार यांनी नवरात्री उत्सवाच्या परंपरेचे आणि सामाजिक एकतेचे महत्त्व विशद केले.

विशेष म्हणजे,अजय कंकडालवार यांच्याकडून काही मंडळांच्या ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.भक्तीभावाने सजवलेल्या मंडळांमध्ये आरती,भजन,आणि देवीच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.

तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध बतुक्कम्मा मंडळांनाही कंकडालवार दाम्पत्याने भेट देऊन बतुक्कम्मा पूजा केली.तेलंगणा आणि गडचिरोलीच्या सीमाभागात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा हा सण महिलांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.यावेळी महिलांनी पारंपारिक वेशात फुलांनी सजवलेल्या बतुक्कम्मासह पूजा केली.सौ. सोनालीताईंनीही महिलांसोबत सहभागी होऊन पूजा केली व त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला.

यावेळी बोलताना अजयभाऊ व सोनालीताईंनी समस्त जनतेला सद्दूला बतुक्कम्मा व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले,शारदा माता व दुर्गा माता सर्वांना सुख,समृद्धी,उत्तम आरोग्य व शांती देवो.आपल्या परिसरात एकोपा,बंधुभाव आणि विकासाची गंगा अशीच वाहत राहो, हीच देवीचरणी प्रार्थना.

या दौऱ्यात कंकडालवार दाम्पत्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते,मंडळांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close