Uncategorized

मेडपल्ली येथील रोहिणी वेलदीचे दीर्घआजाराने दुःखद निधन

डॉ.अजय कंकडालवार यांनी घेतली वेलदी कुटुंबाची सांत्वनपर भेट, केली आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली येथील रहिवाशी महेश वेलदी यांची कन्या कु.रोहिणी महेश वेलदी (वय १९ वर्ष) हिचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.घरातील महालक्ष्मी गेल्याने वेलदी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुःखद घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ मेडपल्ली येथे जाऊन वेलदी कुटुंबाची भेट घेतली.

यावेळी डॉ.कंकडालवार यांनी शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.तसेच मायेने विचारपूस करत,होणाऱ्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली आणि पुढे काहीही अडचण आल्यास निसंकोचपणे सांगा मी तुमच्या पाठीशी आहे,असा धीर दिला.त्यांच्या या माणुसकीच्या भावनेमुळे शोकाकुल कुटुंबाला मोठा आधार मिळाला.

यावेळी मेडपल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश वेलदी,पेरमिली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम,मेडपल्लीचे माजी सरपंच सतीश वेलदी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close