Uncategorized

अहेरी तालुक्यातील रस्ता आंदोलनाला यश; प्रशासनाकडून लेखी आश्वासन, उद्यापासून काम सुरू होणार

छल्लेवाडा : अहेरी तालुक्यातील गोलाकर्जी-रेपनपल्ली मुख्य मार्गाच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या धान रोवणी व रस्ता रोको आंदोलनाला अखेर यश आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात आज सकाळी १० वाजता छल्लेवाडा-कमलापूर दरम्यानच्या खड्ड्यात आंदोलन करण्यात आले.यावेळी शेकडो कार्यकर्ते,ग्रामस्थ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.अधिकाऱ्यांनी उद्यापासून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.तसेच गोलाकर्जी ते राजाराम पर्यंत सिमेंट रोड आणि राजाराम ते कमलापूर नवीन डबरीकरण तसेच रेपनपल्ली ते कमलापूर सिमेंट रस्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याचे आश्वासनही दिले.

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर डॉ.कंकडालवार यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाला आम्ही जागे केले आहे. उद्यापासून काम सुरू नाही झाले तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू,असा इशारा डॉ.कंकडालवार यांनी दिला.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close