रात्रीच्या वेळी धावले मदतीला : रुग्णाची विचारपूस करून डॉ.अजय कंकडालवार यांनी दिला आत्राम कुटुंबाला धीर

अहेरी : तालुक्यातील इतलचेरू येथील रहिवाशी उज्वला आत्राम यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ही माहिती किस्टापूर ग्रामपंचायतीच्या सदस्या जीवनकला ताई यांनी रात्रीच्या वेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना फोन करून माहिती दिली.परिस्थितीची गांभीर्यता लक्षात घेऊन डॉ.कंकडालवार यांनी वेळेचा विलंब न करता तातडीने निर्णय घेतला.
माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार हे रात्रीच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले.त्यांनी उज्वला आत्राम यांची रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी डॉ.कंकडालवार यांनी उपस्थित डॉक्टरांशी चर्चा केली.डॉक्टरांनी सांगितले की,उज्वला आत्राम यांची प्रकृती गंभीर आहे.त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात येत आहे.
रुग्णाला रेफर करण्यात येत असल्याचे कळताच डॉ.कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबीयांना धीर दिला.गडचिरोलीला उपचारादरम्यान तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मला तातडीने संपर्क करा.मी सर्वतोपरी मदत करेन असे आश्वासन त्यांनी दिले.
डॉ.कंकडालवार यांच्या या तातडीच्या मदतीमुळे आणि दिलेल्या आधारामुळे आत्राम कुटुंबीयांनी त्यांचे मनापासून आभार मानले.



