Uncategorized

शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांचा शेतकरी व शेतमजूर कल्याणासाठी संवेदनशील उपक्रम

धान रोवणी करणाऱ्या मजुरांना रेनकोट वाटप,पावसाळ्यातील काम होणार सुरक्षित

गडचिरोली : धान रोवणीच्या हंगामात पावसाचा,चिखलाचा आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत अखंड परिश्रम करणाऱ्या शेतमजुरांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या उद्देशाने शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांच्या हस्ते शेतातील धान रोवणी करणाऱ्या मजुरांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

शेतकरी व शेतमजूर कल्याणासाठी एक संवेदनशील उपक्रम,या भावनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विदर्भातील शेतीचा कणा असलेले शेतमजूर पावसाळ्यात दिवसभर पाण्यात,चिखलात उभे राहून धानाची रोपणी करतात.त्यांच्या या मेहनतीमुळेच आपल्या ताटात अन्न येते.मात्र पावसात भिजल्यामुळे त्यांना सर्दी,ताप आणि इतर आजारांना सामोरे जावे लागते.

हीच बाब लक्षात घेऊन शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांनी पुढाकार घेतला.शेतात रोवणीचे काम करणाऱ्या मजुरांना थेट शेतात जाऊन रेनकोटचे वाटप करण्यात आले.यामुळे पावसापासून संरक्षण होऊन त्यांचे काम अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.

शेतमजुरांचा सन्मान – समृद्ध शेतीचा पाया

या उपक्रमाबद्दल बोलताना शितलताई व भोलूभाऊ सोमनानी म्हणाल्या,शेतमजूर हेच खऱ्या अर्थाने अन्नदाते आहेत.त्यांच्या श्रमामुळेच शेती बहरते.त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.

पावसाळ्यातील काम अधिक सुलभ व्हावे,मजूर बांधवांचे आरोग्य जपले जावे आणि त्यांच्या श्रमाला सन्मान मिळावा,यासाठीच हा छोटासा प्रयत्न आहे.शेतकरी आणि शेतमजूर सुखी राहिल्याशिवाय समाज समृद्ध होऊ शकत नाही.

या उपक्रमामुळे शेतमजुरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.रेनकोट मिळाल्याने त्यांनी शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांचे आभार मानले.

शेती क्षेत्रातील जाणकारांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले आहे.शेतकरी व शेतमजुरांच्या हितासाठी अशा लोकाभिमुख उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे.यामुळे केवळ मदतच नाही तर श्रमिकांप्रती आदराची भावनाही निर्माण होते,अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

शेतमजुरांचा सन्मान – समृद्ध शेतीचा पाया हा संदेश देत शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांनी शेती आणि शेतमजूर यांच्यातील नाते अधिक घट्ट केले आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close