Uncategorized

नॅशनल हायवे ३५३-सी च्या बांधकामात मोठा खोळंबा ; कंत्राटदाराच्या मनमानीमुळे मजूर-उपकंत्राटदार संतप्त

साईट सोडून परतले ; 3 महिन्यांपासून पेमेंट नाही, प्रशासनाचे मात्र मौन

गडचिरोली : जिल्ह्यातील महत्वाकांक्षी नॅशनल हायवे ३५३-सी च्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि कंत्राटदाराची मनमानी समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी या मार्गावरील रस्ता बांधकामाचे डायव्हर्जन वाहून गेल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

 

कामाच्या ठिकाणी मुख्य कंत्राटदार आणि मजुरांमध्ये वारंवार वाद होत असल्याने संतप्त झालेले मजूर व उप-कंत्राटदार आपले साहित्य घेऊन साईट सोडून परत आहेत.कामावर असलेल्या मजुरांनी आणि उप-कंत्राटदारांनी व्हिडिओद्वारे गंभीर आरोप केले आहेत.

 

त्यांचे म्हणणे आहे :

1.पेमेंट थकीत : गेल्या 3 महिन्यांपासून मजुरांना कोणताही मोबदला मिळालेला नाही. वारंवार मागणी करूनही कंत्राटदार फोन उचलत नाहीत आणि पेमेंट देण्यास टाळाटाळ करत आहेत.

2.मनमानी कारभार : कंत्राटदार कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय स्वतःच्या मर्जीने हिशोब करत असून पेमेंटमधून बेकायदेशीर कपात करत आहेत.

3.धमक्या : मेहनतीचा पैसा मागितल्यास “काम करायचे असेल तर करा, नाहीतर निघून जा” अशा प्रकारे धमक्या दिल्या जात आहेत.

4.प्रशासनाचे मौन : आजपर्यंत कोणत्याही कामाचे बिल सर्टिफाय केलेले नाही.तसेच वर्क ऑर्डर देखील अद्याप सर्टिफाय झालेली नाही.

सुरुवातीला सुमारे 45 मजुरांना सोबत घेऊन हे काम सुरू करण्यात आले होते.मात्र वेळेवर पगार न मिळाल्याने आणि कोणतीही शाश्वती नसल्याने मजूर मेटाकुटीला आले आहेत.अनेकांच्या संसारावर, मुलांच्या शिक्षणावर आणि दैनंदिन गरजांवर याचा थेट परिणाम झाला आहे.आम्ही आमचा पैसा वसूल करण्यासाठी आता ही साईट सोडून परत जात आहोत.जिथे आम्हाला आमच्या मेहनतीची कमाई आणि सन्मान मिळत नाही,तिथे काम करणे कठीण आहे”असे मजुरांनी सांगितले.

या प्रकारामुळे एन.एच. ३५३-सी च्या कामाचे भवितव्य आता अधांतरी झाले आहे. वरिष्ठ प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून चौकशी करावी आणि मजुरांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास मजूर संघटनांसह मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close