Uncategorized

गंजीरामन्नापेठा येथील जि.प. शाळा पूर्ववत सुरु करण्याची पालकांची मागणी

तहसीलदारां मार्फत पालकांनी सादर केले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन

सिरोंचा : सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नडीकुडा केंद्राचे गंजीरामन्नापेठा येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा मागील वर्षीपासून पटसंख्येअभावी शिक्षण विभागाने बंद केल्याने गावातील शालेय विध्यार्थ्यांसमोर शैक्षणिक समस्या उद्भवली आहे.त्यामुळे शिक्षणविभागाप्रती गावातील शालेय विध्यार्थी व पालकवर्गामध्ये तीव्र असंतोष पसरलेलं आहे.

अंकिसा जवळील गंजीरामन्नापेठा येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा किमान या शालेय सत्रापासून तरी पूर्ववत सुरु करून विध्यार्थ्यांना गावातच शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावं, म्हणून संतप्त पालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आज सिरोंचाचे नायब तहसीलदार श्री.एन.हलामी साहेब यांची येथील सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम व पोचमपल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीमती ललिता सल्ला यांनी पालकवर्गाला सोबत घेऊन शाळा पूर्ववत सुरु करण्यासाठी तहसीलदार यांच्या कक्षेत चर्चा घडवून आणले तसेच तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व मुख्यकार्यपालन अधिकारी गडचिरोली यांना निवेदन सुद्धा पाठविले.

पालकवर्गाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी गडचिरोली यांना पाठविलेल्या निवेदनात,सरकार एकीकडे 6 ते 14 वर्ष वयोगटातील एकही शाळाबाह्य व दाखलपात्र विध्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये,अन प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे अनिवार्य असतांना सुद्धा फक्त पटसंख्येअभावी संपूर्ण शाळाचं बंद करणे,हे चुकीचे असल्याचे म्हंटले आहे.

गंजीरामन्नापेठा येथील शाळा अचानकपणे बंद करून येथील विध्यार्थ्यांना रंगधामपेठा येथील शाळेत संलग्न केले.परंतु सदरहू महामार्गावरून शाळेचे अंतर हे चार कि.मी.दुरीचे असल्याने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज राष्ट्रीय महामार्गांवरून पायदळ ये-जा करने जोखमीचे ठरणार आहे.

गावात प्राथमिक शिक्षण घेणारे एकूण चौदा विद्यार्थी असून या विध्यार्थ्यांची मागील वर्षीपासून शैक्षणिक नुकसान होतं असल्यांचे निवेदनात म्हंटले आहे.

गंजीरामन्नापेठा येथील जिल्हा परिषदेची शाळा या सत्रापासून पूर्ववत सुरु करून गावातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून न दिल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याची इशारा पालकांनी निवेदनातून दिली आहे.

सिरोंचाचे नायब तहसीलदार श्री.हलामी साहेब यांना निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम,माजी सरपंच श्रीमती ललिता सल्ला,रमेश कस्तुरी,शंकर कुमरी,सुरेश दुर्गम,कोंडय्या जोडे, सारय्या नामाला सह सर्व पालकवर्ग उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close