Uncategorized

पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेत मोठा घोळ! बँक ऑफ महाराष्ट्र मुलचेरा शाखेत अनियमितता

विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे शेतकऱ्यांचे निवेदन, अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात चौकशीची मागणी

मुलचेरा (गडचिरोली) शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत मुलचेरा येथे मोठी अनियमितता समोर आली असून,बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा मुलचेरा येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पात्र यादीत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष कर्जखात्यातील थकीत मुद्दल व व्याजापेक्षा कमी रक्कम दाखविण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांच्या बाबतीत मुद्दलापेक्षाही कमी रक्कम समाविष्ट केली असून,तर अनेकांच्या व्याजाची रक्कमच कर्जमाफीत धरली नसल्याचा आरोप आहे.यामुळे पात्र शेतकऱ्यांनाही उर्वरित रक्कम स्वतः भरण्याची सक्ती बँकेकडून केली जात आहे.

याबाबत बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता,या चुका शासन स्तरावर झाल्या आहेत,उर्वरित रक्कम तुम्ही भरा असे उत्तर दिल्याचा दावा शेतकऱ्यांनी निवेदनात केला आहे.त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्याऐवजी शेतकऱ्यांवरच अनावश्यक आर्थिक भुर्दंड पडत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी,यासाठी आज मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे जेष्ठा नेते व ब्रम्हपुरी मतदारसंघचे लोकप्रिय आमदार,माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात बँक ऑफ महाराष्ट्र, मुलचेरा शाखेतील संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची तपासणी करून,प्रत्यक्ष थकीत मुद्दल व व्याज आणि कर्जमाफी यादीतील रकमेची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा,अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

यावेळी निवेदन सदर करतांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम,पंकज गुड्डेवार,रामभाऊ मेश्राम,रजनीकांत मोटघरे,कुणाल पेंदोरकर,रुपेश टिकले,नंदू वाईलकर,कालिदास कुसनाके तालुका अध्यक्ष मुलचेरा आदिवासी काँग्रेस कमेटी,रामू सोमा तोरे धनूर,सुधाकर गुड्डी सेडमाके,तिरमा गुड्डी सेडमाके,शालीक सेडमाके,सरपत नैताम,बिचेंगा सिडाम,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांच्यासह शेतकरी व काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जमाफीतील तफावत तात्काळ दूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close