Uncategorized

कोर्ला येथील पागे कुटुंबाला तेरवी कार्यक्रमाला डॉ.अजय कंकडालवार यांचाकडून आर्थिक मदत

सिरोंचा : तालुक्यातील कोर्ला येथील रहिवाशी नागेश समय्या पागे याला पहाटे संध्याकाळी दरम्यान चक्कर येऊन बीपी वाढल्याने त्यांची अचानक मूत्यू झालं आहे.पागे परिवार अंत्यत गरिबी असून अंत्यविधी कार्यक्रमातुन कसेबासी बाहेर पडले.

मात्र पुढील होणाऱ्या तेरवी कार्यक्रमला आर्थिक अडचण बसत असल्याची माहिती झिंगानूर येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र कुमरी व येथील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांना दिले होते.

पागे कुटुंबांची अडचण लक्षत घेऊन होणाऱ्या तेरवी कार्यक्रमाला मृतक नागेश पागे यांची पत्नी सुनीता पागे व मुलगा रितेश पागे याला आर्थिक मदत पाठवण्यात आली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुमरी,कोर्ला बौध्द समाज मंडळ अध्यक्ष समय्या कुमरी,बौद्ध समाज मंडळ सचिव सुनील दुर्गम,माजी उपसरपंच मलय्या दुर्गम,समाजसेवक रमेश तोगर,प्रतिष्ठित नागरिक,श्रीनिवास पागे यांच्या सह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close