Uncategorized

चिंचगुंडी येथील वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी डॉ.कंकडालवार कडून आर्थिक मदतीचे हात

अहेरी : तालुक्यातील चिंचगुंडी येथील निराधार वृद्ध महिला दुर्गाबाई बाना देव्हारा यांची दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले होते.मृतक महिला ही निराधार असल्याने तिच्या अंत्यसंस्कार कार्यक्रम करण्यासाठी आर्थिक अडचण बासत होती.

या निराधार मृतक महिलेची परिस्थिती येथील सामाजिक कार्यकर्ते मदनय्या पानेम यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांना दिली.त्यावेळी डॉ.अजयभाऊ कंकडालवार हे बाहेर गावी दौऱ्यावर होते.तरीही कंकडालवार यांनी वेळेचे विलंब न करता अहेरीचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांना सांगून देव्हारा कुटुंबाला तात्काळ आवश्यक आर्थिक मदत करण्याची सूचना दिली.

यावेळी स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांनी चिंचगुंडी गाठून निराधार वृद्ध महिलेच्या अंत्यविधी कार्यक्रमासाठी अजय भाऊ कंकडालवार यांनी पाठविलेल्या आर्थिक सहाय्य त्यांनी त्यांच्या जवळील नातेवाईकांना सुपूर्द केले तसेच स्वर्गरताची व्यवस्था करून देण्यात आली.

काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या या सामाजिक कार्याप्रती चिंचगुंडी येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close