ओड्डीगुडम येथील माहिलम्मा देवी बोनालु कार्यक्रमाला काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार यांची सपत्नीक उपस्थिती

अहेरी : तालुक्यातील ओड्डीगुडम येथे माहिलम्मा देवीच्या बोनालू पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ओड्डीगुडम येथे माहिलम्मा देवी बोनालू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
माहिलम्मा देवीच्या बोनालू कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार,काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून?
माहिलम्मा देवीची दर्शन घेतले.यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी माहिलम्मा देवी कडे प्रार्थना केली.
यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनीता कूसनाके,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व स्थानिक कार्यकर्ते तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



