Uncategorized

टिकेपल्लीतील महाशिवरात्री यात्रेत नाटकाची मेजवानी

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नाट्यप्रयोगाचे उदघाटन

अहेरी : तालुक्यातील चुटूगुंटा ग्रामपंचायत अंतर्गत टिकेपल्ली गावात महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त 15 फेब्रुवारीला’आई तू माझी होशील का’हे नाटक सादर करण्यात आले.या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.महाशिवरात्री यात्रेनिमित्त श्री.शिवशंकर मंदिर प्राणहिता नदी घाट टिकेपल्लीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

जय बजरंग नाट्य दंडार कलाकृती चेकबेरडी वतीने ‘आई तू माझी होशील का’नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.नाटकाचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून चुटुगुंटाच्या सरपंच साधना मडावी,सहसचिव दिनेश मडावी,उपसरपंच शांतीग्राम श्रीकांत समद्दार,सत्यवान कोरेत टिकेपल्ली,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,खाय्युम पठाण,राकेश सडमेक,सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ मडावी,सामाजिक कार्यकर्ते मछिंगट्टा शंकर पानेमावर,सामाजिक कार्यकर्ते येल्ला हिरामण कोरेत टिकेपल्ली,किशोर नैताम टिकेपल्ली,गंगाराम टेकूलवार टिकेपल्ली,मारोती रामपूर सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष अजय नैताम,उपाध्यक्ष भीमराव कोरेत,सचिव तुळशीराम मडावी,कोषाध्यक्षा विलास टेकूलवार यांच्या सह परिसरातील भाविक तसेच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते,गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close