Uncategorized
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचाहस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

अहेरी : तालुक्यातील रामपूर येथील मेलबर्न स्टार सी.सी.रामपूर द्वारे भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.सदर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजय कंकडालवार यांचाहस्ते करण्यात आली आहे.क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात आली.द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी कडून तसेच तृतीय पारितोषिक खमनचेरू ग्रामपंचायतचे सरपंच सायलूजी मडावी कडून देण्यात आली आहे.यावेळी परिसरातील क्रिकेट प्रेमी व समस्त गावकरी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.



