सत्तेत नसतानाही जनतेच्या बांधावर;काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी घेतली मरपल्ली टोला गावाची पाहणी

मुलचेरा : निवडणुका आल्या की नेते दिसतात,मात्र निवडणुका नसतानाही जनतेच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणारे आणि त्यांना धीर देणारे नेतृत्व म्हणजे डॉ.अजयभाऊ कंकडालवार होय.याच जनसेवेच्या व्रताला अनुसरून गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा अर्जुनी-मोरगाव विधानसभा प्रभारी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी आज मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल असलेल्या मरपल्ली टोला गावाला भेट दिली.
गावात पोहोचताच ग्रामस्थांनी अजयभाऊंचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.यावेळी त्यांनी गावातील वृद्ध,महिला,शेतकरी आणि युवकांशी सविस्तर चर्चा केली.गावातील मुख्य समस्यांबाबत ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या.
ग्रामस्थांच्या सर्व समस्या शांतपणे आणि गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर अजयभाऊ कंकडालवार यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.ते म्हणाले,मरपल्ली टोला हे माझे स्वतःचे गाव आहे.तुमच्या समस्या या माझ्या समस्या आहेत.गावात निर्माण झालेल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करेन.रस्ता,पाणी आणि आरोग्याच्या प्रश्नाला मी प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करेन.तुम्ही काळजी करू नका,मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे.
अजयभाऊंच्या या शब्दामुळे ग्रामस्थांमध्ये नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.अतिदुर्गम भागात येऊन आपली विचारपूस केल्याबद्दल ग्रामस्थांनी अजयभाऊंचे मनापासून आभार मानले.
अशा दौऱ्यांमुळे अजयभाऊ कंकडालवार हे केवळ नेते नसून,जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे खरे जनसेवक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



