Uncategorized

धोडराज येथे क्रीडा महोत्सवाचा थाटात शुभारंभ; अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ग्रामीण टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन

भामरागड : तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोडराज येथे सध्या क्रिकेटचा थरार आणि क्रीडा उत्सव सुरू झाला आहे.येथील युवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी पामूलगौतम क्रीडा मंडळ,धोडराज च्या वतीने भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे थाटात उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख सह-उद्घाटक म्हणून भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी आणि सुधाकर कुरसामी हे उपस्थित होते.

या स्पर्धेकडे केवळ धोडराजच नव्हे,तर संपूर्ण भामरागड तालुक्यातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.याचे कारण म्हणजे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली आकर्षक बक्षिसे.

या सदर क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक काँग्रेस नेते व माजी जि.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून देण्यात येत आहे,तर द्वितीय पारितोषिक कर्मचारीवृंद व ग्रामसभा धोडराज यांच्याकडून,तृतीय पारितोषिक भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी व प्रसाद कुड्यामी यांच्याकडून देण्यात येणार आहे.

उद्घाटनप्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना अजयभाऊ कंकडालवार म्हणाले,भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील युवकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आणि जिद्द आहे.अशा ग्रामीण टेनिस बॉल स्पर्धांमुळे युवकांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळते.खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती तर मिळतेच,पण सांघिक भावना,शिस्त आणि एकोपा देखील वाढतो.युवकांनी मोबाईल आणि व्यसनापासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात आपले करिअर करावे.पामूलगौतम क्रीडा मंडळाने केलेले हे आयोजन खरोखरच कौतुकास्पद आहे.या मंडळाच्या पाठीशी आणि येथील युवकांच्या पाठीशी मी नेहमी खंबीरपणे उभा राहीन.अजयभाऊंच्या या प्रेरणादायी भाषणानंतर उपस्थित युवकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.

या उद्घाटन सोहळ्याला प्रसाद कुडयामी तालुका युवककॉग्रेस अध्यक्ष भामरागड, विष्णू मडावी उपाध्यक्ष नगरपंचायत भामरागड,राजू कुरसामी वनहक्क समिती अध्यक्ष,राजू वड्डे माजी नगराध्यक्ष भामरागड,रमेश पुंगाठी माजी सरपंच,प्रभाकर मडावी तालुका उपाध्यक्ष भामरागड,नंदू महाका सरपंच ग्रामपंचायत परायणार,महेश वरसे,प्रवीण मोगरकर ओबीसी सेल काँग्रेस अध्यक्ष भामरागड,आकाश मोगरकर,कविश्वर मोतकुरवार पत्रकार यांच्या सह धोडराज,भामरागड व परिसरातील शेकडो क्रीडाप्रेमी,ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close