Uncategorized

काँग्रेसनेते अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांचा हस्ते भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील विराट सि.सि.इंदाराम गेर्रा द्वारा भव्य ग्रामीण क्रिकेट टेनिस बाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी हे होते.

सदर स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके कडून तसेच तृतीय पारितोषिक इंदाराम ग्रामपंचायतचे सरपंच वर्षा पेंदाम,उपसरपंच वैभव कंकडालवार,ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव सोयाम कडून देण्यात येत आहे.

यावेळी कार्यक्रमला वैभव कंकडालवार उपसरपंच ग्रामपंचायत इंदाराम,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत इंदाराम,जयाबाई तेलंगे सदस्य ग्रामपंचायत इंदाराम,शामराव राऊत माजी उपसरपंच,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,माधव राऊत,बिचू गावडे,गंगाराम तोर्रेम,भालेराव नैताम,चिंनू कुळमेते,सचिन पंचार्यासह गावकरी नागरीक बहुसंकेने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close