Uncategorized

काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या इंदाराम निवासस्थानी येथे श्रीगणरायाची प्रतिष्ठापणा

अहेरी : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा इंदारम येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थी निमित्त श्रीगणरायाची विधिवत पूजा व अर्चना करून भक्तिमय वातावरणात श्रीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.श्रीगणेश चतुर्थी निमित्त कंकडालवार यांनी समस्त जनतेला शुभेच्छा दिले.तसेच समस्त जनता नेहमी आनंदी,निरोगी सुखीजीवन लाभावे म्हणून त्यांनी श्रीगणपती बाप्पा चरणी प्रार्थना केले.

इंदाराम येथील श्रीची प्रतिष्ठापना तसेच पूजा व अर्चना वेळी त्यांचे मातोश्री मंदाबाई कंकडालवार,अर्धांगिनी सोनाली कंकडालवार,इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,स्मिता वैभव कंकडालवार,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,ऋतुराज कंकडालवार,रिध्वी कंकडालवारसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close