Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आत्राम परिवाराच्या तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील महागाव येथील रहिवासी शंकर पोच्या सिडाम यांचे जावई सुरेश चिन्ना आत्राम यांचे काही दिवसांपूर्वी दुखत निधन झाले होते.सुरेश आत्राम यांच्या परिवार अंत्यत गरीब असून अंत्यविधी कार्यक्रमातुन कसेबसे बाहेर पडले.

पण समोर होणाऱ्या तेरवी कार्यक्रमाला आत्राम परिवाराला आर्थिक अडचण भासत होती.आज आत्राम परिवारातील नातेवाईक व सदस्यांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.कंकडालवार यांनी आत्राम कुटुंबाची अडचण बघून तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत केली.आर्थिक मदत  मिळाल्याने आत्राम कुटुंबातील नातेवाईक व सदस्याचे चेहऱ्यावर आनंदाची वातावरण दिसून आले.तसेच कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी मदत करतांना अजयभाऊ कंकडालवार यांच्या सोबत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नरेश गर्गम,कार्तिक तोगाम,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,ग्रामपंचायत सदस्य वंदना दुर्गे,शेखर पानेम,महेश दहागावकर,प्रकाश दुर्गे,शंकर सिडामसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close