खेळ रंगला छल्लेवाड्यात ; अजय कंकडालवार यांचा हस्ते स्पर्धेला सुरुवात

अहेरी : अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा गावात सध्या क्रीडा उत्सवाचे वातावरण आहे.भीमशक्ती युवा मंडळ, छल्लेवाडा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडले.संपूर्ण गाव या स्पर्धेसाठी सज्ज झाले असून,खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.तर सहउद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्री.हनुमंतू मडावी हे उपस्थित होते.उद्घाटन होताच टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांनी संपूर्ण मैदान दुमदुमून गेले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जि.प. सदस्य अजय नैताम यांनी स्थान भूषविले.प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्री राजू दुर्गे,माजी सभापती भास्कर तलांडे,कार्तिक तोगम,सुरेखा आलम,तिरुपती झाडे,समय्या कोंडागुर्ला,रामा भसारकर,पोचाय्या जनगम,सांबय्या वाघाडे,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी सरपंच श्रीनिवास पेंदाम,माजी उपसरपंच संजय पोरतेट,विलास बोरकर,दासू कांबळे,रामप्रसाद मुजमकर, पोशाया जनगम,राजमलू झाडे, रामा भासरकार,नागुलु मुजमकर, शंकर मुजमकर,देवाजी जनगम, लहुनू दुर्गे,राजेंद्र चौधरी,पापया चापले यांच्यासह समस्त छल्लेवाडा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेला अधिक रंगत आणण्यासाठी आयोजकांनी भव्य पारितोषिकांची घोषणा केली आहे.या स्पर्धेला प्रथम पारितोषिक – डॉ. अजय कंकडालवार यांच्याकडून द्वितीय पारितोषिक – आविसं व काँग्रेस कार्यकर्ते, अज्जूभाऊ कार्यकर्ते यांच्याकडून तर तृतीय पारितोषिक – भीमशक्ती युवा मंडळ, छल्लेवाडा यांच्याकडून देण्यात आला.पारितोषिकांची घोषणा होताच खेळाडूंमध्ये आणखी जोश निर्माण झाला.
यावेळी बोलताना डॉ.अजय कंकडालवार म्हणाले,ग्रामीण भागातील तरुणांमध्ये खूप मोठी क्रीडा क्षमता आहे,फक्त त्यांना योग्य व्यासपीठाची गरज आहे.भीमशक्ती युवा मंडळाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले,याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.खेळामुळे तरुणांमध्ये शिस्त,एकता आणि संघभावना निर्माण होते.मी नेहमीच खेळाडूंच्या आणि तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.त्यांच्या या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
स्पर्धेच्या निमित्ताने छल्लेवाडा गावात जणू जत्राच भरली आहे.परिसरातील अनेक गावांतील संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.महिला,तरुण,ज्येष्ठ नागरिक सर्वांनीच मैदानावर गर्दी केली होती.लहान मुलांमध्येही या स्पर्धेबद्दल मोठी उत्सुकता दिसत होती.भीमशक्ती युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विशेष परिश्रम घेतले.मैदानाची तयारी,मंडप व्यवस्था,ध्वनी व्यवस्था अशा सर्व गोष्टींचे नियोजन अत्यंत उत्तम पद्धतीने करण्यात आले होते.



