Uncategorized

काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून मद्दीकुंठा येथील मृतक पुल्लूरी कुटुंबाला आर्थिक मदत

सिरोंचा : तालुक्यातील मद्दीकुंठा येथील श्रीनिवास पुल्लूरी यांचा आठवडाभरा पूर्वी दुःखद निधन झाले होते.या निधनाची वार्ता येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना मिळाली होती.या दुःखद घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेते कंकडालवार यांनी मृतकाचे तेरवी कार्यक्रमाला आपल्या परीने आर्थिक मदतीचे हात दिले.

काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी मृतक कुटुंबाला पाठविलेल्या आर्थिक मदत सिरोंचा चे माजी उपसरपंच व काँग्रेसचे युवा नेतृत्व रवी सल्लम व बोरमपल्लीचे काँग्रेसचे नेते वेंकटस्वामी रामटेके यांनी मृतक कुटुंबाला सु्फूर्द केले.

मृतक पुल्लूरी कुटुंबाला आर्थिक मदत करतांना काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते संपत पुल्लूरी, राजम पुल्लूरी,रवी पुल्लूरी, नागेश मेडिजरला उपस्थित होते.या आर्थिक मदतीबद्दल मृतकाचे कुटुंबियांनी काँग्रेस नेते कंकडालवार यांचे प्रती आभार व्यक्त केले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close