Uncategorized

रानडुकराच्या हल्ल्यात महीला जखमी : माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली पाहणी

अहेरी : नागेपाल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या संड्रा येथील सौ.इंदू बाजीराव गावडे हे शेतात खपूस काढण्यासाठी गेले असता महिला कापूस काढतांना रानडुक्कर त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले.

रानडुक्करने एका महिलेला गंभीर जखमी केल्याची माहिती येथील कार्यकर्ते व गावकर्यांकडून माहिती मिळताच क्षणाचा विलंब न करता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजय कंकडालवार अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या त्याबेत बाबतीत विचार पूस केले.

तसेच त्या महिलांची व गावडे परिवारांची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतले आहे.दरम्यान कंकडालवार सांगितले की समोर कोणत्याही अडचण भासल्यास आपण सदैव आपल्या पाठीशी असल्याचे सांगत गावडे कुटुंबाला मोठा धीर दिले

त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयात भर्ती असलेल्या रुग्णांशी सदिच्छा भेट दिले रुग्णालयात आपल्याला काही अडचण भासल्यास मला भ्रमणद्वनी द्वारे संपर्क साधावा असे काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णांशी भेट देऊन सांगितले

त्यावेळी अजय कंकडालवार सोबत माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सौ.सुरेखा आलम यांच्या सह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close