Uncategorized

आलापल्लीत ‘सूरज डीजे’ चा दणक्यात शुभारंभ; डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

आलापल्ली : येथील होतकरू युवा उद्योजक सूरज गाजलवार यांनी सुरू केलेल्या नव्या डीजे व साऊंड सिस्टीम व्यवसायाचे उद्घाटन आज शुक्रवार दि. ५ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या पावन मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले.

या व्यवसायाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी सूरज गाजलवार यांना शुभेच्छा देताना सांगितले की,आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांनी स्वतःचा रोजगार निर्माण करणे ही काळाची गरज आहे. सूरजने कमी वयात मोठा व्यवसाय सुरू करून इतर तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या नवीन व्यवसायाला भरभराट लाभो व त्याच्या हातून उत्तम सेवा घडो.

यावेळी आलापल्ली परिसरातील नागरिक, मित्रपरिवार, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सूरज गाजलवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close