सिरोंचा तहसीलदार कार्यालयावर शेकडो आदिवासी अतिक्रमणधारकांनी दिली धडक
सिरोंच्याचे तहसीलदारांना अतिक्रमण जमिनीची नमुना ई-पंजीमध्ये नोंदीसाठी निवेदन

सिरोंचा : तालुक्यातील झिगानूर माल,झिगानूर चेक नं.. 1..,2,वडदेल्ली रै,मंगीगुडम, येडसीली व अमडेल्ली येथील शेकडो आदिवासी व दलित प्रवर्गातील अतिक्रमण धारकांनी सिरोंचा येथील तहसीलदार कार्यालयावर धडक देत तहसीलदार सिरोंचा यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
तालुक्यातील झिगानूर परिसरातील पाच गावातील वंनजमिनीवरील अतिक्रमण धारकांनी सिरोंच्याचे तहसीलदार ए. टी.सकुंदरवार यांना दिलेल्या निवेदनात,झिगानूरसह परिसरातील अनेक अतिक्रमण धारकांनी आपल्या अतिक्रमण जमिनीची नोंदी नमुना ई-पंजीमध्ये केले नाही.आम्ही अशिक्षित असल्याने तसेच अतिक्रमाणाची नमुना ई-पंजी नोंदीबाबत आम्हाला आवश्यक माहिती नसल्याने आम्ही आमच्या अतिक्रमाणाची नोंदी केले नाही.
त्यामुळे आम्हाला वनहक्क दावे दाखल करण्यासाठी नमुना ई-पंजीमधील अतिक्रमण नोंदीची पुरावा मिळू शकत नाही आहेत.नमुना ई -पंजीचे सबळ पुराव्या अभावी आम्हाला वनहक्क दाव्यांपासून वंचित रहावं लागत आहेत.
झिगानूरसह सर्व गावांमधील वनजमिनीवरील वनहक्क अतिक्रमण धारकांची योग्य चौकशी करून सर्वांना नमुना ई-पंजी नोंदी मिळवून देण्याची तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आले.
यावेळी सिरोंच्याचे तहसीलदार सकुंदरवार यांना उपस्थित सर्व गावांमधील अतिक्रमणधारकांची मुख्य समस्या सिरोंचाचे सामाजिक कार्यकर्ता रवी सल्लम व रामचंद्रम कुमरी यांनी समजावून सांगितले असता यावर तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिले.सिरोंचाचे तहसीलदार ए.टी. सकुंदरवार यांना निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते रवी सल्लम, रामचंद्रम कुमरी,पेंटा कुळमेथे,बोडका गावडे,उपसरपंच शेखर गणरापू,सिरिया मडावी, राकेश गावडे,मेंगा गावडे,मुल्ला आत्राम,दामोधर आत्राम,राकेश गावडे,पोचामडावी,कापा मडावीसह पाच गावातील शेकडो अतिक्रमण धारक उपस्थित होते.



