अहेरी तालुक्यातील अवलमारी येथील साई शंकर राहुलवार याने रासायनिक औषध प्राशन
काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार यांनी घेतली रुग्णालयात धाव,केली विचारपूस

अहेरी : तालुक्यातील मौजा अवलमारी येथील रहिवासी साई शंकर राहुलवार यांनी अज्ञात कारणातून रासायनिक औषध (कीटकनाशक) प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
त्यांनी रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण साई राहुलवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व घडलेल्या घटनेबाबत माहिती घेतली.
यानंतर अजय कंकडालवार यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांची देखील भेट घेऊन रुग्णाच्या प्रकृतीबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी डॉक्टरांनी सांगितले की,रुग्णाला वेळेवर रुग्णालयात आणल्यामुळे त्याची प्रकृती आता पूर्वीपेक्षा थोडी बरी आहे.सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून पूर्णपणे क्लिअर झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात येईल.
दरम्यान यावेळी अजय कंकडालवार यांनी राहुलवार कुटुंबाला धीर देत उपचारासाठी काहीही अडचण आल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा,आपण सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत असे आश्वासन दिले.



