Uncategorized

आलापल्ली येथील तिरुपती बोम्मावार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

काँग्रेस नेते डॉ.अजय कंकडालवार व हनुमंतू मडावी यांनी घेतली सांत्वनपर भेट

आलापल्ली येथील रहिवासी तिरुपती बोम्मावार यांचे काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका (हार्ट अटॅक) आल्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या अकस्मात जाण्याने बोम्मावार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आलापल्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली डॉ.अजयभाऊ कंकडालवार आणि सचिव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी श्री.हनुमंतू मडावी यांनी आज आलापल्ली येथे बोम्मावार परिवाराच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली.

यावेळी त्यांनी बोम्मावार परिवाराचे सांत्वन करीत या कठीण प्रसंगात आपण परिवाराच्या सोबत असल्याचे सांगितले.तसेच मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची शक्ती देवो, अशा भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close