डॉ.अजय कंकडालवार यांची जामिनावर सुटका – सिरोंचा काँग्रेस नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

अहेरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष मा.डॉ.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांची 52 दिवसांनंतर चंद्रपूर कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे.
एका प्रकरणात ते गेल्या 52 दिवसांपासून चंद्रपूर कारागृहात होते.काल म्हणजे आगस्ट 2 रविवारी रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केल्याने त्यांची सुटका झाली.ही बातमी समजताच संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
डॉ.कंकडालवार यांच्या सुटकेनंतर अहेरीत आगमन होताच त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत,ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली.”अजयभाऊ आगे बढो,हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी संपूर्ण अहेरी नगरी दुमदुमून गेली होती.
52 दिवसांपासून आपल्या नेत्याला भेटण्यासाठी आसुसलेले डॉ.कंकडालवार यांना पाहून भावूक झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या?
यावेळी सिरोंचा तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सिरोंचा बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुन आकुला,काँग्रेसचे युवा नेते व माजी उपसरपंच रवी सल्लम, संचालक नागराजू इंगली, डॉ.अजय कंकडालवार यांचे सोशल मीडिया ऑपरेटर संपत गोगूला,मारुती गणपूरपु,वेंकट रेड्डी,दिनेश कोय्याला यांच्यासह इतर प्रमुख काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ.कंकडालवार यांच्या अहेरी येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली,भेटीदरम्यान सर्वांनी त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डॉ. कंकडालवार यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.हा संघर्ष काळात तुम्ही सर्वांनी दिलेला पाठिंबा आणि प्रेम यामुळेच मला बळ मिळाले.जनतेच्या सेवेसाठी मी नेहमीच तत्पर आहे आणि यापुढेही जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत राहीन असे ते म्हणाले.
त्यांच्या सुटकेमुळे जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून,आगामी काळात पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



