वडिलांच्या स्मृतीत संतोषभाऊंचा उपक्रम : पर्यटकांना मिळणार थंड पाणी
कमलापूर हत्ती कॅम्प येथे पाणपोईचे लोकार्पण : तनुश्रीताई आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

कमलापूर ( प्रतिनिधी ) स्व.रामचंद्र ताटीकोंडावार यांच्या स्मृती प्रित्यर्थ गडचिरोली जिल्हा भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी कमलापूर शासकीय हत्ती कॅम्प येथे पर्यटकांच्या सोयीसाठी उभारलेल्या ‘पाणपोई’चे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात पार पडले.
सदर पाणपोईचे उद्घाटन मा.धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या व सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी तनुश्रीताईंनी संतोषभाऊ ताटीकोंडावार यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना सांगितले की,वडिलांच्या स्मृती समाजसेवेतून जिवंत ठेवण्याचा हा आदर्श उपक्रम आहे.उन्हाळ्यात पर्यटकांना पाणपोईचा मोठा आधार मिळेल.
या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी गौरेश गडमाळे. क्षेत्र सहाय्यक पेन्दोर सामाजिक कार्यकर्त्या सारिकाताई गडपल्लीवार, कमलापूरचे सरपंच रजनीताई मडावी, माजी सरपंच सांबय्या करपेत,माजी पंचायत समिती सदस्या मानतय आत्राम ग्रा प सदस्य माया आईला,मनातय्या ,संतोष बोम्मावार,कैलास कोडापे,स्नेहदीप आत्राम,पूजाताई येडला,मनोहर रालावंडी यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व परिसरातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना संतोषभाऊ म्हणाले,माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमी सेवा करण्याची शिकवण दिली.त्यांच्याच स्मरणार्थ ही पाणपोई सुरू केली.कमलापूर हत्ती कॅम्पला येणाऱ्या लहान मुले,वृद्ध, पर्यटकांना उन्हातून थंडगार पाणी मिळावे हा एकमेव उद्देश आहे.जलदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.
कमलापूर हत्ती कॅम्प हे जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन स्थळ असून येथे दररोज शेकडो पर्यटक भेट देतात.उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती.आता पाणपोई सुरू झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.



