भंगारामपेठा येथे ‘सल्ला गागर’ अनावरण व सामूहिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

अहेरी : तालुक्यातील भंगारामपेठा येथील गोटूल भूमी,स्व.विठ्ठल गंगा आलम यांच्या पाठांगणात आज एका भव्य आणि मंगलमय वातावरणात’सल्ला गागर’ अनावरण आणि सामूहिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले.
कार्यक्रमाचे दिमाखदार उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी सल्ला गागरचे अनावरण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आदिवासी संस्कृतीमध्ये गोटूल आणि सामाजिक परंपरांचे महत्त्व अधोरेखित करताना,अशा सामूहिक उपक्रमांमुळे समाजातील एकता अधिक घट्ट होते,असे मत कंकडालवार यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच कार्यक्रमा ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा पार पडले असून नवदाम्पत्यांचा संसार थाटला या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेला सामूहिक विवाह सोहळा.अनेक जोडप्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात प्रवेश केला.लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून साध्या आणि सुसंस्कृत पद्धतीने विवाह करण्याच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
विवाहबंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यांना त्यांच्या पुढील सुखी संसारासाठी अजय कंकडालवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विविध गृहपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.नवदाम्पत्यांनी आपला संसार सुखाचा करावा आणि समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे,अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांना आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमाला भंगारामपेठा परिसरातील नागरिक व स्थानिक काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्व.विठ्ठल गंगा आलम यांच्या पाठांगणात झालेली ही गर्दी आणि लोकांचा उत्साह पाहता,हा सोहळा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव हनुमंतू मडावी,सरपंच किरण कोडापे,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,बालू बोगामी काँग्रेस तालुका अध्यक्ष भामरागड,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जु पठाण,विष्णु मडावी उपाध्यक्ष नगरपंचायत भामरागड,नरेश मडावी सरपंच किष्ठापूर,लक्ष्मण कोडापे (ग्रा.प.सदस्य) रेपनपली श्रीनिवास पेन्दाम (माजी सरपंच) कमलापुर,गुलाब सोयाम माजी सरपंच,राजु दुर्गे (ग्रा.प.सदस्य महागांव) सुखदेव आलाम (ग्रा.पं. राजाराम )चिन्नू सडमेक,प्रसाद कुड्यामी,धानू आत्राम,बब्बी चौधरी,प्रमोद कोडापे,दादाराव सडमेक,पार्वती वेलादी,वासंती आलाम,शिवानी कोडापे,साक्षी आत्राम,वंचिता आलाम,पुनाम आलाम,भाग्यश्री सडमेक,संद्या सडमेक,आरती वेलादी,अमिषा आलाम,लक्ष्मी आलाम,अजली तलाडी,पार्वती वेलादी,संगीता सडमेक,कविता तलंडी,रसिकाला सडमेक,दिलीप आत्राम,वासंती आलाम,शिवानी कोडापे,साक्षी आत्राम,वंचिता आलाम,पुनाम आलाम,भाग्यश्री सडमेक,संद्या सडमेक,दिलीप आलाम,अशोक आलाम,गुरूदास सडमेक,बंडू आलाम,सनम्पत आलाम,सुरेश वेलादी,श्रीनिवास कोडापे,विकास आलाम,अंकुश कोडापे,अविनाश कोडापे,अंकित सडमेक,सतीश आलाम,संदीप आलाम,सत्रसेन तोडसाम यांच्या सह आदी उपस्थित



