तोडसा टोला येथे डोलू गावडे यांच्या गृहप्रवेशाला डॉ.अजय कंकडालवार यांची उपस्थिती; नव्या वास्तूसाठी दिल्या शुभेच्छा

अहेरी : तालुक्यातील तोडसा टोला येथील प्रतिष्ठित नागरिक डोलू गावडे यांच्या नूतन वास्तूचा गृहप्रवेश सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला.या मंगल प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी विशेष उपस्थिती लावून गावडे कुटुंबाचा आनंद द्विगुणित केला.
गावडे कुटुंबाचा आनंद गगनात मावेना डोलू गावडे यांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने तोडसा टोला येथे सुंदर घर साकारले आहे.या घराच्या गृहप्रवेशासाठी अजय कंकडालवार व हनुमंतू मडावी यांना निमंत्रित करण्यात आले होते.गावडे कुटुंबांचे निमंत्रणला मन देऊन डॉ.अजय कंकडालवार यांनी वेळात वेळ काढून या दुर्गम भागातील कार्यक्रमाला हजेरी लावल्याने गावडे कुटुंबासह गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
यावेळी डॉ.अजय कंकडालवार व हनुमंतू मडावी यांनी नूतन वास्तूचे पूजन करून गावडे परिवाराला सुखी आणि समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.केवळ उपस्थिती न लावता,त्यांनी गावडे परिवाराला प्रेमळ भेट वस्तू देऊन आपला स्नेह व्यक्त केला.
नवे घर हे केवळ विटा-मातीचे बांधकाम नसून ते एका कुटुंबाचे स्वप्न असते.डोलू गावडे यांनी अतिशय कष्टाने हे घर उभारले असून,या घरात त्यांना सुख,शांती आणि भरभराट लाभो,अशा भावना डॉ.अजय कंकडालवार यांनी यावेळी व्यक्त केल्या.
डॉ.अजय कंकडालवार हे नेहमीच अहेरी विधानसभा क्षेत्र सह गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या सुख-दु:खात धावून जात असतात.तोडसा टोला सारख्या भागातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या किंवा नागरिकाच्या घरी जाऊन त्यांनी दाखवलेली ही आपुलकी चर्चेचा विषय ठरत आहे.त्यांच्या या साधेपणामुळे आणि जनसंपर्कामुळे उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
या सोहळ्याला परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि तोडसा टोला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी डोलू गावडे यांनी डॉ.कंकडालवार यांचे आभार मानले.



