Uncategorized

पायदळ पुलावरून पडून ६० वर्षीय शंकर पोट्टी मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू

बाजार करून घरी परतत असताना घडली घटना....अहेरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह स्वगावी रवाना

अहेरी : बाजार करून घरी परतत असताना पायदळ पुलावरून खाली पडल्याने शंकर पोट्टी मडावी (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहेरी परिसरात घडली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,शंकर पोट्टी मडावी हे बाजार करून घरी परतत होते.यावेळी पायदळ पुलावरून जात असताना अचानक तोल जाऊन ते पुलावरून खाली पडले.या अपघातात त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेनंतर त्यांना पुढील कार्यवाहीसाठी अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (पोस्टमॉर्टेम) आणण्यात आले.दरम्यान ही माहिती मिळताच काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांना याची खबर मिळाली.त्यांनी तत्काळ आपल्या कार्यकर्त्यांना रुग्णालयात पाठवून पोस्टमॉर्टेमसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली.शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह त्यांच्या स्वगावी पाठविण्यात आला.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close