Uncategorized

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : काँग्रेसनेते कंकडालवार

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते राजाराम येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन

अहेरी : तालुक्यातील राजाराम येथील जय बिरसा मुंडा मंडळ राजाराम द्वारे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या व्हॉलीबॉल स्पर्धेची उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समीर संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

त्यावेळी उदघाटन करतांना अजयभाऊ मानले की’आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबरच खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे.खेळामुळे क्रीडा गुणांना चालना मिळते प्रत्येक युवकांमध्ये क्रीडा गुण असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि जिल्ह्याचा व क्षेत्राचा नावलौकीक वाढवावा असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेस नेते हणमंतू मडावी यांच्या कडुन प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.तर द्वितीय पारितोषिक राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबगोनीवार,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद आत्राम कडून तसेच तृतीय पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,राजाराम ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय पोरतेट कडून देण्यात आली आहे.

कार्यक्रमांचे अध्यक्ष राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबगोनीवार होते.उपाध्यक्ष म्हणून माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद आत्राम होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम,माजी सदस्य सुनीता कूसनाके होते.

काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी गावात आगमन होतच विविध नूत्या करत ढोल तशाने फटाकेची अतिशय बाजी करत जंगी स्वागत केली.उदघाटन संपलेवार येथील नागरिकांची संवाद साधात येथील समस्या जाणून घेतले.

सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भगवान बिरसा मुंडा,वीर बाबुराव शेडमाके प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मंचवर कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,हरिश भाऊ,नागेश कन्नाके माजी सरपंच, नारायण कभगोणिवार,सुंदर आत्राम,विलास पोरतेट,सोयाम सर,उमेश आलम,दिपक आलम,सीताराम आत्राम,विलास मडावी,विनायक आलम,रमेश पेंडांम,संदीप आत्राम,आशिष गावडे, अक्षय पोरटेट,श्रीनिवास मडावी,परशुराम सडमेक,विशाल सोयाम,अजय पोरतेट,चंद्रशेखर दादा, वेंकटी मडावी,लक्ष्मण कंबागोनीवार, राकेश मडावी,गजानन मडावी यांच्या सह परिसरातील क्रीडा प्रेमी व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close