Uncategorized

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरेल असे काम करून मैदान गाजविलेच पाहिजे : काँग्रेसनेते कंकडालवार

मुलचेरा : तालुक्यातील गीताली येथे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जय दुर्गा क्रिकेट क्लब गीताली द्वारे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेची उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

त्यावेळी उदघाटन करतांना अजयभाऊ मानले की’आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबरच खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे.खेळामुळे क्रीडा गुणांना चालना मिळते प्रत्येक युवकांमध्ये क्रीडा गुण असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि जिल्ह्याचा व क्षेत्राचा नावलौकीक वाढवावा असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

या क्रिकेट स्पर्धेसाठी काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.तर द्वितीय पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंतू मडावी – सोशल मीडिया अध्यक्ष गोपाल कविराज कडून तर तृतीय पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते वेंकटेश धानोरकर – कोठारी ग्रामपंचायतचे सदस्य कालिदास कुसनाके कडून देण्यात आली.

काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी गावात आगमन होतच विविध नूत्या करत ढोल तशाने फटाकेची अतिशय बाजी करत जंगी स्वागत केली.उदघाटन संपलेवार येथील नागरिकांची संवाद साधात येथील समस्या जाणून घेतले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंतू मडावी होते.उपाध्यक्ष म्हणून शांतीग्राम ग्रामपंचायतचे रोजगार ससेवक नितीन जोद्दार होते.

यावेळी मंचावर बासु मुजुमदार माजी उपसभापती,श्रीकांत समद्दार उपसरपंच,कालिदास कुसनाके ग्रामपंचायत सदस्य,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,अजूभाऊ पठाण माजी सरपंच आलापल्ली,राजूभाऊ दुर्गे ग्रामपंचायत सदस्य महागाव,राकेश अलूरवार,व्यंकटेश धानोरकर,सुरेश आत्राम उपसरपंच चुटूगुंट्टा,लिंगा टेकूलवार,साईनाथ पानेमवर,शंकर पानेमवार,संतोष हजारें,काशिनाथ मडावी,राम वेलादी,जॅकी कुसनाके,गिरमाजी सिडाम,विकास सेडमाके,संजय कोडापे,अशोक श्रीरामवार,किशोर मडावी,रॉबिन मंडल,नितीन जोद्दार,मिथुन रफ्तान,सुरेश बाला,दिनेश मडावी,अजय नैताम,हिरामण कोरेत,महेश बुरमवार,सलाम मामू,प्रकाश दुर्गेप्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह परिसरातील क्रीडा प्रेमी व समस्त गावकरी तसेच मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close