Uncategorized
देवलमरी येथील भोई समाजाचे गंगा माता देवी उत्सवाला काँग्रेस नेते कंकडालवार यांची उपस्थिती
भक्तिमय वातावरणात गंगा माता देवीची उत्सव थाटात संपन्न

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भोई -ढिवर समाज बांधवांकडून गंगा माता देवीची प्राणप्रतिष्ठापणा मोठया उत्साहात करण्यात आली.
या उत्सवाला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उपस्थिती दर्शवून गंगा माता देवींची विधिवत पूजा अर्चना करून त्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गंगा माता देवीला समस्त जनतेच्या कल्याण हेतू मनोभावे प्रार्थना सुद्धा केले.गंगा माता देवी दर्शनाच्या वेळी काँग्रेस नेते कंकडालवारसह काँग्रेस पक्षाचे व आविसंचे स्थानिक कार्यकर्ते,पदाधिकारी,आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


