Uncategorized

कंकडालवार दामपत्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध बतकम्मा मंडळला दिली भेट

अहेरी : बतकाम्मा“तेलंगणा राज्यातील संस्कृतीशी जोडलेल्या बतकम्मा उत्सवाची परंपरा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील महिला जोपासत आहेत.पित्रूमोक्षा अमावास्येला सुरू होणार्‍या या सणाची दसऱ्याच्या आदल्या दिवशी सांगता केली जाते.

हा सण काकतीया साम्राज्याच्या कालावधीपासून तेलंगणात मोठ्या उत्साहात साजरा करतात.बतकम्मा उत्सवादरम्यान बांबूच्या परडी वर विविध प्रकारची फुले ठेवून त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आकार दिला जातो.सजविलेल्या फुलांना बतकम्मा म्हणतात.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बतकाम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.अहेरी विधानसभा क्षेत्रातील इंदाराम,मद्दीगुडम,आलापल्ली मुख्य चौक,आलापल्ली वार्ड नंबर 4,रामय्यापेठा,मोदुमडगु,अहेरी रामपूरसह आदी सद्दूला बतकाम्मा उत्सव मंडळाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार तसेच सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हणमंतु मडावी यांनी भेट घेऊन बतकम्मा व शारदा माताचे पूजन केले.त्यावेळी कंकडालवार परिवाराकडून शारदा व दुर्गा,बतक्कमा मंडळाला वर्गणी देण्यात आली.

ह्यावेळी मंडळाने कंकडालवार दामपत्याला स्वागत केले.ह्यावेळी नवरात्र व बतकम्मा दसरा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ह्या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्य,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रशांत सरकाटे,राकेश अग्गुवार,पुणेश कंदिकूरवार,रज्जाक पठाण,अनिल इस्कापे,शोभण कोंडरावार,रमेश गोगुलवार,नाईनवार,मिस्त्री ताई,नरेंद्र गर्गम,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गे,प्रवीण कोरेत,अविनाश गेडामसह स्थानिक कार्यकर्ते व महिला मंडळी तसेच शारदा व दुर्गा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close