Uncategorized

आलापल्ली येथील मद्देर्लावार ओलेटीवार परिवाराच्या विवाह सोहळ्याला ; कंकडालवार दाम्पात्यांची उपस्थित

शुभविवाह सोहळा आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न ; नवदांपत्याला भेट वस्तू देत दिले शुभाशीर्वाद

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथे वेंकटेश मद्देर्लावार यांच्या सुपुत्र व स्व.जगय्याजी मद्देर्लावार यांचा नातू यश संग रुचिता यांचा विवाह सोहळा वासवी सेलेब्रेशन हॉल आलापल्लीयेथे उत्साहात संपन्न झालं आहे.

आलापल्ली येथे यश संग रुचिता यांचा शुभविवाह सोहळा आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.पारंपरिक विधी,मंगलाष्टकांच्या गजरात आणि वऱ्हाडी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

या मंगल प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार व काँग्रेस नेत्या,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार दाम्पात्यांनी उपस्थित राहून नवदांपत्याला भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले.त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष मान प्राप्त झाला.

यावेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मद्देर्लावार,ओलेटीवार परिवाराचे नातेवाईक,मित्रपरिवार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी नवदांपत्याला शुभेच्छा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त केल्या.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close